भाजपकडून रवींद्र धंगेकरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये शिवसेनेसाठी जागा सोडण्यास भाजपने नकार दिल्यामुळे धंगेकरांनी अजित पवार यांच्या कडे ही पत्नी आणि मुलासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र थेट देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फोन करून धंगेकरांना उमेदवारी देऊ नका असं सांगितल्याने धंगेकरांचा तो ही प्लॅन फेल झाला होता.
advertisement
पुण्यात शिंदे- भाजप युती तुटली
त्यामुळे आज धंगेकरांसह सकाळपासून शिवसेना शिंदे गटाने युती तुटल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. 165 एबी फॅार्म वाटल्याच सांगितलं. मात्र उदय सामंत आल्यावर त्यांनी युती कायम असल्याचं सांगितलं. दरम्यान आता अर्ज माघारी घेण्यापर्यंत हे त्रांगड असंच सुरू राहणार आहे
भाजपच्या नेत्यांशी वैर नडलं?
धंगेकर आणि शहरातील भाजपाच्या नेत्यांमधील वैर सर्वश्रुत आहे. केवळ यामुळेच भाजप शिवसेना युतीच्या बैठकांमध्येही धंगेकर यांना लांब ठेवण्यात आलं आहे. भाजपने शिवसेनेला ज्या जागा देऊ केल्या आहेत. त्यामध्ये मध्यवर्ती शहरातील एकही जागा नाही. यावरूनही भाजप शिवसेना नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. स्वतः धंगेकर हे भाजपकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची तक्रार नेत्यांकडे करत आहेत. एवढेच नाही तर सुरुवातीपासूनच त्यांनी अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढावे. जागांसाठी भाजपची लाचारी पत्करू नये अशी भूमिका शीर्षस्थ नेत्यांपुढेही मांडली आहे.
