प्रकरण नेमकं काय?
आरोपी प्रकाश आणि मनीषा हे दोघेही विवाहित असून त्यांना मुलेही आहेत. गेल्या काही काळापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, प्रकाशला आता हे अनैतिक संबंध नको होते, तर मनीषा याला तयार नव्हती. ती वारंवार प्रकाशचा पिच्छा पुरवत असल्याने त्याने तिला कायमचे संपवण्याचा कट रचला. १८ मार्च रोजी प्रकाशने मनीषाला बोलवून कात्रज बोगद्याजवळील वाडा हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या जंगलात नेले. तिथे तिचा गळा आवळून त्याने खून केला आणि मृतदेह तिथेच टाकून तो पसार झाला.
advertisement
मनीषा बेपत्ता असल्याने तिच्या नातेवाइकांनी पोलिसांत धाव घेतली होती. तपासादरम्यान प्रकाश तिखात्री याचे नाव समोर आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि स्वतः पोलिसांना घटनास्थळी नेले. १० दिवस उलटल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण होते, मात्र कपड्यांवरून तिच्या भावाने ओळख पटवली.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
