TRENDING:

धक्कादायक! हिंदू धर्मात घरवापसीनंतर पुण्याची सायली सुर्वे बेपत्ता; घरच्यांच्या त्या आरोपानं शहरात खळबळ

Last Updated:

मुस्लीम धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केल्यामुळे चर्चेत आलेली माजी 'मिस इंडिया अर्थ' सायली सुर्वे (अद्या सुर्वे) बेपत्ता झाली आहे. सायलीच्या माहेरच्या व्यक्तींनी तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
(गोविंद वाकडे, प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड: काही दिवसांपूर्वीच मुस्लीम धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केल्यामुळे चर्चेत आलेली माजी 'मिस इंडिया अर्थ' सायली सुर्वे (अद्या सुर्वे) बेपत्ता झाली आहे. सायलीच्या माहेरच्या व्यक्तींनी तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे, शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास करून सायलीचा शोध घ्यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे.
सायली सुर्वे (अद्या सुर्वे) बेपत्ता
सायली सुर्वे (अद्या सुर्वे) बेपत्ता
advertisement

सायली सुर्वेने १० वर्षांपूर्वी मीरा-भाईंदरमधील उद्योजक आतिफ तासे याच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर तिचे नाव 'अलीझा तासे' असे ठेवण्यात आले होते. मात्र, १० वर्षांच्या संसारानंतर तिने सासरच्या मंडळींवर छळ आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. एका मुलाखतीत तिने दावा केला होता की, "मला संमोहित करून लग्नासाठी प्रवृत्त करण्यात आले होते. हा छुप्या पद्धतीने केलेला 'लव्ह जिहाद' होता."

advertisement

विधीपूर्वक 'घरवापसी' आणि शुद्धीकरण

सततचा छळ सहन केल्यानंतर सायलीने आपल्या चार मुलांसह स्वधर्मात परतण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच पुण्यात खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिचे विधीपूर्वक शुद्धीकरण करण्यात आले होते. या 'घरवापसी'नंतर तिचे नाव 'अद्या सुर्वे' असे ठेवण्यात आले असून, तिने आपल्या चार मुलांनाही हिंदू धर्माची दीक्षा दिली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, फक्त 3 हजारांत सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय, आता सिद्धीची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

शुद्धीकरणानंतर अवघ्या काही दिवसांतच सायली बेपत्ता झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तिच्या कुटुंबियांच्या मते, सासरच्या मंडळींनी तिचे अपहरण केले असण्याची दाट शक्यता आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा निषेध करत सायलीचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! हिंदू धर्मात घरवापसीनंतर पुण्याची सायली सुर्वे बेपत्ता; घरच्यांच्या त्या आरोपानं शहरात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल