या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणूक आम्ही इंडिया म्हणूनच लढणार आहोत. मात्र जागा वाटपाबाबत अद्याप बोलणं झालेलं नाहीये. इंडियात जेव्हा तिकीट वाटपाचा विषय येईल तेव्हा जो उमेदवार पास होईल त्यालाच तिकीट मिळेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून एकोमंकांच्या जागांवर दावा करणं सुरू आहे. काल काँग्रेसनं राष्ट्रवादीच्या माढा मतदारसंघावर दावा केला होता. तर आज राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या सोलापूर मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
advertisement
सुप्रिया सुळे या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला देखील महागाईच्या मुद्द्यावरून जोरदार टोला लगावला आहे. आम्ही सरकारवर प्रेशर आणले, त्यामुळे आता महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. इतक्या दिवस महागाई कमी करणं का सूचलं नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.
