TRENDING:

Pune Mumbai: पुणे-मुंबई अंतर आता आणखी कमी! 'मिसिंग लिंक'चं काम शेवटच्या टप्प्यात; 'या' तारखेपासून मार्ग होणार खुला

Last Updated:

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बोगद्यामध्ये आधुनिक 'अलार्म यंत्रणा' बसवण्यात आली आहे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. तब्बल १८१ मीटर उंचीच्या देशातील सर्वात उंच दरीपुलाचे आव्हान पेलत, प्रशासनाने प्रकल्पाचे ९३ टक्के काम पूर्ण केले आहे. हा नवा मार्ग मे २०२६ पर्यंत सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे.
'मिसिंग लिंक'चं काम शेवटच्या टप्प्यात
'मिसिंग लिंक'चं काम शेवटच्या टप्प्यात
advertisement

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे (MSRDC) राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश घाटातील १३.३ किलोमीटरचे अंतर कमी करणे हा आहे. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पात १.६८ किमी आणि ८.८७ किमी लांबीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्यातील आव्हानात्मक परिस्थितीमुळे कामात काही अडथळे आले होते. मात्र आता केबल बसवणे आणि पुलाचे दोन्ही मार्ग जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

advertisement

मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांनी अडवली कार; आत 2 महिला अन् सोबत पुरुष, दरवाजा उघडताच बसला धक्का

प्रकल्पाच्या खर्चातही मोठी वाढ झाली असून, २०१९ मधील ६,६९० कोटी रुपयांचे बजेट आता साडेसात हजार कोटींच्या घरात पोहोचले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बोगद्यामध्ये आधुनिक 'अलार्म यंत्रणा' बसवण्यात आली आहे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध होईल. या प्रकल्पामुळे खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.

advertisement

पुणे ते नवी मुंबई विमानतळ सव्वा दोन तासात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

गामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) केवळ मुंबईसाठीच नाही, तर पुणेकरांसाठीही अत्यंत सोयीचे ठरणार आहे. विमानतळ प्रशासनाने अलीकडेच एक मार्गदर्शक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून विमानतळापर्यंत सर्वात कमी वेळेत पोहोचण्यासाठी कोणता मार्ग सर्वोत्तम आहे, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. या व्हिडिओनुसार, पुणे किंवा सातारा बाजूने येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा मुख्य कणा आहे. एक्सप्रेसवेवरून पुढे आल्यावर जेएनपीए (JNPA) रोड हा विमानतळाला जोडणारा सर्वात कार्यक्षम आणि वेगवान मार्ग आहे. हा मार्ग वापरल्यामुळे प्रवाशांना पनवेल शहरात न शिरता थेट विमानतळाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचता येईल.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Mumbai: पुणे-मुंबई अंतर आता आणखी कमी! 'मिसिंग लिंक'चं काम शेवटच्या टप्प्यात; 'या' तारखेपासून मार्ग होणार खुला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल