TRENDING:

सायंकाळची वेळ, आळंदीचा तो रस्ता अन् सार्वजनिक ठिकाणीच तिचं नको ते कृत्य; पोलिसांनी घडवली महिलेला अद्दल

Last Updated:

संबंधित महिलेच्या या कृत्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याने आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
पिंपरी-चिंचवड : सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करत, अश्लील हावभाव करून वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (२४ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दिघी येथील गजबजलेल्या आळंदी रस्त्यावर करण्यात आली.
महिलेवर गुन्हा दाखल (प्रतिकात्मक फोटो)
महिलेवर गुन्हा दाखल (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमका प्रकार काय?

दिघी-आळंदी रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून काही महिला सार्वजनिक ठिकाणी उभ्या राहून वाटसरूंना अश्लील इशाऱ्यांद्वारे अडवत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. मंगळवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या 'अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा'ने (AHTU) या परिसरात सापळा रचला. यावेळी चऱ्होली येथील एक ४३ वर्षीय महिला रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना अडवून वेश्या व्यवसायासाठी खुणावत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

advertisement

पोलिसांची धडक कारवाई

संबंधित महिलेच्या या कृत्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याने आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार गणेश सीताराम कारोटे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या ४३ वर्षीय महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ना खत, ना पाणी, नुसत्या हवेवर पिकतोय गहू, सांगलीच्या खास शेतीचा Ground Report
सर्व पहा

आळंदी रस्ता हा वारकरी आणि सामान्य नागरिकांच्या वर्दळीचा रस्ता आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे अनैतिक प्रकार घडत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी होती. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातून समाधान व्यक्त केले जात असून, अशा समाजविघातक कृत्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/
सायंकाळची वेळ, आळंदीचा तो रस्ता अन् सार्वजनिक ठिकाणीच तिचं नको ते कृत्य; पोलिसांनी घडवली महिलेला अद्दल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल