वाहतुकीत नेमके काय बदल?
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते रात्री १० या वेळेत शहरातील प्रमुख मार्गांवर सर्वसामान्य वाहनांना प्रवेश बंदी असेल. भोसरी, चिखली आणि चाकण या तीन महत्त्वाच्या विभागांतर्गत खालील बदल करण्यात आले आहेत:
भोसरी परिसर: हरिओम स्वीट चौक ते दिघी रोड आणि दिघी चौक ते दिघी रोड हा मार्ग पूर्णपणे बंद असेल. या भागातील वाहतूक आळंदी रोडमार्गे वळवण्यात आली आहे.
advertisement
चिखली/मोशी परिसर: पुणे-नाशिक महामार्गावरून मोशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कुदळवस्तीकडे जाणारी वाहतूक बंद राहील. वाहनचालकांनी भारतमाता चौकाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा.
चाकण परिसर: चाकण चौक, महात्मा फुले चौक, नेहरू चौक, आंबेठाण चौक आणि मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.
अत्यावश्यक सेवांना सूट
मिरवणुकीत सहभागी असलेली वाहने आणि रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे. मात्र, इतर सर्व खाजगी आणि सार्वजनिक वाहनांना या मार्गांवर प्रवेश मिळणार नाही.उद्या दिवसभर शहरातील मुख्य चौकांमध्ये गर्दी होण्याची शक्य ता असल्याने, नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
