TRENDING:

'मी गेलो तरी कंपनी बंद ठेवू नका, देशाचं नुकसान नको', कर्मचाऱ्यांनी सांगितली रतन टाटांची आठवण

Last Updated:

रतन टाटा यांनी पिंपरी चिंचवडमधल्या टाटा मोटर्स प्लांटमध्येच निवृत्ती घोषित केली होती. इथल्या कर्मचाऱ्यांनी आता केंद्र सरकारकडे रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोविंद वाकडे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पिंपरी चिंचवड : उद्योगपती रतन टाटा यांचं वृद्धापकाळाने वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. रतन टाटांच्या निधनामुळे उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. टाटा उद्योग समुहातील कंपन्यांतील कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातल्या टाटा मोटर्स प्लांटमधील कामगारांनी रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केलीय. रतन टाटा यांनी पिंपरी चिंचवडमधल्या टाटा मोटर्स प्लांटमध्येच निवृत्ती घोषित केली होती.

advertisement

टाटा मोटर्सच्या पिंपरी चिंचवड इथल्या प्लांटमध्ये ते नेहमी यायचे.  हा प्लांट रतन टाटांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा होता. इथल्या प्रत्येक कामगारांशी ते भेटायचे आणि संवाद साधायचे. आज रतन टाटा यांच्या निधनाने हे कामागर पोरके झाले. मात्र आजही टाटा मोटर्स कंपनीत काम सुरू ठेवण्यात आलंय.

advertisement

हजारो कर्मचारी काम करत असलेल्या या टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये टाटांचे निधन झाल्यानंतरही काम बंद ठेवण्यात आलेलं नाही. मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा. देशाचं, कामगारांचं नुकसान व्हायला नको असं स्वत: टाटांनी सांगितलं होतं असं कामगारांनी सांगितलंय. टाटा प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी रतन टाटांसोबतच्या आठवणी जाग्या केल्या.

Ratan Tata: घर ते ऑफिस रतन टाटा यांच्या साधेपणाचे 7 किस्से

advertisement

रतन टाटा यांचा वारस कोण?

रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा वारस कोण होणार, त्यांची जागा कोण घेणार, या चर्चांना उधाण आले आहे. टाटा समूहाच्या उद्योग साम्राज्याची धुरा कोणाच्या हाती जाणार, याचीही चर्चा रंगली आहे. टाटा समूहाची धुरा कोणाच्या हाती असणार, याचे नियोजन आधीच करण्यात आले आहे. एन. चंद्रशेखर यांनी २०१७ मध्ये होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली. टाटा कुटुंबातील इतर सदस्य देखील टाटा समूहातील इतर उद्योगांचे नेतृत्व करत आहेत.

advertisement

रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. नोएल टाटा हे नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन यांचे पुत्र आहेत. कुटु्ंबातील सदस्य म्हणून त्यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, नोएल टाटा यांच्या वयामुळे कदाचित त्यांच्या तीन मुलांपैकी एकावर टाटा समूहाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

मराठी बातम्या/पुणे/
'मी गेलो तरी कंपनी बंद ठेवू नका, देशाचं नुकसान नको', कर्मचाऱ्यांनी सांगितली रतन टाटांची आठवण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल