शरद मोहोळची टोळीयुद्धातून हत्या
भाजपने प्रभाग क्रमांक 11 मधून स्वाती शरद मोहोळ यांना आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. स्वाती मोहोळ या कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी असून त्यांनी रामबाग कॉलनी आणि शिवतीर्थनगर या भागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच शरद मोहोळची टोळीयुद्धातून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर त्याच्या पत्नीला राजकीय मैदानात उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
advertisement
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर आता भाजपनेही तोच कित्ता गिरवला असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रभागात स्वाती मोहोळ यांच्या एन्ट्रीमुळे ही निवडणूक आता चुरशीची ठरणार आहे. या भागातील जुने कार्यकर्ते आणि मतदारांचा कौल कोणाकडे झुकणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.
2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी 2023 मध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कुख्यात गुन्हेगाराच्या पत्नीला पक्षात येण्याची परवानगी दिल्याबद्दल विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. अशातच आता स्वाती यांना तिकीट देखील देण्यात आलंय.
शरद मोहोळ कोण होता?
शरद मोहोळ हा मोहोळ गँगचा म्होरक्या होता. पुण्यात 2006 मध्ये गुंड संदीप मोहोळ याच्या हत्येनंतर शरद मोहोळ हा मोहोळ गँगचा म्होरक्या बनला होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण सारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद होती. त्याच्यावर गज्या मारणे टोळीतील गुंड पिंटू मारणेची हत्या केल्याचा आरोप होता. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला होता. पण त्यानंतरही त्याची कूकृत्य सुरुच होते. त्याने दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केलं होतं. या प्रकरणी त्याला पोलिसांनी पुन्हा अटक केली होती. पण अटकेनंतरही तो जेलमध्ये शांत राहिला नाही. शरद मोहोळने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकी याचा खून केला होता.
