प्रकरण काय?
आरिफ जलील शेख (वय ३५, रा. विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या नराधम वाहकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी एक अल्पवयीन मुलगी कात्रज आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या शेख याने पीडितेचा मोबाईल नंबर मागून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. मुलीने नंबर देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर, आरोपीने वाईट हेतूने तिला स्पर्श केला आणि अश्लील कृत्य करून विनयभंग केला.
advertisement
नराधम वाहकाच्या कृत्याने घाबरून न जाता मुलीने बसमध्येच आरडाओरडा केला. प्रवाशांच्या हे लक्षात येताच त्यांनी तातडीने शेखला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सहकारनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग (IPC 354) आणि पोक्सो (POCSO) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सार्वजनिक बसमध्ये अशा घटना घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, पुण्यासारख्या शहरात आणि लोकांसमोरच वाहकाने केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
