दरम्यान या प्रकरणातील तपास सध्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. शरद मोहळ हत्याप्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली आहे. मोहळच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेले दोन्ही वकील हत्येनंतर दीड तास आरोपींसोबत होतो, त्यांनी एकत्र प्रवास केला. आरोपींना वकील खेड शिवापूर टोलनाक्यावर जाऊन भेटले अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली. त्यानंतर न्यायालयानं या दोन्ही वकिलांच्या पोलीस कोठडीमध्ये 11 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान यावेळी आरोपी पोलिसांना शरण येणार होते असा दावा या वकिलांकडून करण्यात आला, मात्र हा दावा पोलिसांनी फेटाळून लावला आहे. शरणच यायचं होतं तर मग त्यांनी सीम कार्ड का बदलले? असा प्रश्न पोलिसांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
advertisement
या प्रकरणातील प्रमुख सहा आरोपी दिनांक 15 डिसेंबरला भेटले, या भेटीनंतर त्यांनी वकील रवींद्र पवार याला फोन केला. त्यानंतर पाच जानेवारीला शरद मोहळची हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं. त्यानंतर खेड शिवापूर टोलनाक्यावर वकील रवींद्र पवार आणि वकील संजय उडान त्यांना जाऊन भेटले. त्यांनी आरोपींसोबत दीड तास प्रवास केला, अशी माहिती न्यायालयात पोलिसांकडून देण्यात आली आहे.
