TRENDING:

टेम्पोतील लोखंडी सळ्या घसरल्या अन् थेट धावत्या कारमध्ये आरपार शिरल्या; पुण्यात भयंकर अपघात, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Last Updated:

बालेवाडी परिसरातून एक टेम्पो लोखंडी सळ्या घेऊन जात होता. यावेळी अचानक टेम्पोतील सळ्या पुढच्या बाजूला सरकल्या आणि थेट समोर असलेल्या कारच्या मागील काचेतून आत शिरल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावर बालेवाडी परिसरात आज एक अतिशय थरारक आणि भीषण अपघात घडला. लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोमधील सळ्या थेट समोर असलेल्या चारचाकी वाहनाच्या आत शिरल्या. हा अपघात इतका भीषण होता की, सळ्या कारची काच फोडून आरपार गेल्या होत्या. सुदैवाने, कार चालकाचे दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. मात्र या घटनेने महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
बालेवाडीत भीषण अपघात
बालेवाडीत भीषण अपघात
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडी परिसरातून एक टेम्पो लोखंडी सळ्या घेऊन जात होता. यावेळी अचानक टेम्पोतील सळ्या पुढच्या बाजूला सरकल्या आणि थेट समोर असलेल्या कारच्या मागील काचेतून आत शिरल्या. कारच्या आत लोखंडी सळ्यांचा वेढा असतानाही चालक थोडक्यात बचावला. हे दृश्य पाहून महामार्गावरील इतर वाहनचालकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

advertisement

नियम धाब्यावर बसवून वाहतूक

मुळात लोखंडी सळ्या, पाईप किंवा इतर धोकादायक वस्तूंची वाहतूक करताना त्या वाहनाच्या बाहेर येणार नाहीत आणि सुरक्षितपणे बांधलेल्या असतील याची काळजी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या टेम्पोमध्ये सळ्यांची वाहतूक करताना कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. अशा बेजबाबदार वाहतुकीमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हवामानाचा परिणाम, गहू पिकांवर फुफुंदी मावा रोगाचा प्रदुर्भाव? असं करा व्यवस्थापन
सर्व पहा

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकावर आणि संबंधित मालकावर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. महामार्गावर होणाऱ्या या मृत्यूच्या सापळ्यांना वेळीच लगाम लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
टेम्पोतील लोखंडी सळ्या घसरल्या अन् थेट धावत्या कारमध्ये आरपार शिरल्या; पुण्यात भयंकर अपघात, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल