नवले ब्रिजच्या अलिकडे असणाऱ्या जांभूळवाडी दरीपुलावर हा अपघात झाला. नव्या कात्रज बोगद्याच्या पुढे बंगलोरहून पुण्याच्या दिशेने कंटेनर भरधाव वेगात येत होता. तीव्र उतारावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याने लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले.
अपघातानंतर पहाटे चारच्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य वेगाने सुरू कऱण्यात आले. दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. इतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2023 7:11 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात भीषण अपघात; कंटेनरची बस, टेम्पो अन् कारला धडक, अपघातानंतरचा VIDEO आला समोर
