IT क्षेत्रातील करिअरचा त्याग आणि सामाजिक वसा
मंजुषा नागपुरे यांचे शिक्षण M.Com आणि MBA (HR) पर्यंत झाले आहे. एका नामांकित IT कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत असताना, केवळ समाजसेवेच्या ध्येयाने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांना संघ विचारांचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्यांचे पती दीपक नागपुरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, तर मंजुषा स्वतः 'राष्ट्रसेविका समिती' च्या सक्रिय सेविका आहेत.
advertisement
सिंहगड रस्त्याचा कायापालट करणारी लोकप्रतिनिधी
सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दोन उड्डाणपुलांची संकल्पना सर्वप्रथम मांडणे आणि ती प्रत्यक्षात उतरवणे, यात नागपुरे यांचा मोठा वाटा आहे. सनसिटी-कर्वेनगर पूल आणि पर्यायी रस्त्यांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या 'महिला टॉयलेट आणि सॅनिटेशन' प्रकल्पाला जागतिक स्तरावर 'Google Earth Award' मिळाले असून अनेक परदेशी पाहुण्यांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे.
संकटकाळातील 'First Responder'
प्रशासनावर वचक असलेल्या मंजुषा नागपुरे कोणत्याही आपत्तीत सर्वात आधी धावून जाण्यासाठी ओळखल्या जातात. नुकत्याच एकतानगरीत आलेल्या पूरपरिस्थितीत प्रशासनापेक्षा आधी त्या घटनास्थळी हजर होत्या. शहरी मतदारांच्या भावनांची नस ओळखणारे नेतृत्व आणि भाजपची निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून आज त्या सिंहगड रस्ता परिसरात घराघरात पोहोचल्या आहेत.
