TRENDING:

नवऱ्याच्या मित्रावर प्रेम अन् शेवटी पश्चाताप; पुण्यातील महिलेनं आयुष्य संपवलं, कागदाचे फाटलेले तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ

Last Updated:

पूजा ज्या कंपनीत काम करत होती, तिथल्या कचऱ्यात पोलिसांना कागदाचे काही तुकडे सापडले. पोलिसांनी पारदर्शक टेपच्या मदतीने हे सर्व तुकडे जोडले असता, ती पूजाने लिहिलेली सुसाईड नोट असल्याचे स्पष्ट झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरात एका २७ वर्षीय विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. सुरुवातीला गुढ वाटणाऱ्या या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांनी कचऱ्यात फेकून दिलेल्या आणि फाडलेल्या सुसाईड नोटचे तुकडे एकत्र केले. त्यातून एका भयंकर ब्लॅकमेलिंगचा उलगडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी करण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
विवाहबाह्य संबंध अन् आत्महत्या (प्रतिकात्मक फोटो)
विवाहबाह्य संबंध अन् आत्महत्या (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

मैत्रीचा फायदा अन् विश्वासघात

मृत महिलेचे नाव पूजा (२७) असून ती कल्याणीनगरमधील एका खासगी कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. आरोपी करण शिंदे हा पूजाच्या पतीचा जवळचा मित्र होता. पतीनेच त्याला राहण्यासाठी आपल्या घरी जागा दिली होती. मात्र, करणने मित्राच्या विश्वासाला तडा देत पूजाला प्रेमजाळ्यात ओढले. ही बाब पतीला समजताच घरात वाद सुरू झाले आणि दोघांच्या सुखी संसाराला गळती लागली.

advertisement

पतीने घराबाहेर काढले

काही काळानंतर पूजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने पुन्हा पतीकडे परतण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या आई-वडिलांची माफी मागून पुन्हा संसार उभा करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, करणला हे मान्य नव्हते. तो तिला सतत जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करू लागला. "तू पुन्हा संसार करू शकणार नाहीस," अशा धमक्या देऊन त्याने तिचा मानसिक छळ सुरू केला.

advertisement

पोलिसांनी कसं उलगडलं रहस्य?

पूजा ज्या कंपनीत काम करत होती, तिथल्या कचऱ्यात पोलिसांना कागदाचे काही तुकडे सापडले. पोलिसांनी पारदर्शक टेपच्या मदतीने हे सर्व तुकडे जोडले असता, ती पूजाने लिहिलेली सुसाईड नोट असल्याचे स्पष्ट झाले. त्यात तिने करण शिंदे कशाप्रकारे ब्लॅकमेल करत आहे, याचे सविस्तर वर्णन केले होते. तसेच तिच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंग आणि व्यवहाराचे पुरावेही तिने नमूद केले होते.

advertisement

अखेरचा निरोप आणि माफी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थेट टेरेसवर भरते कवितांची मैफिल, मनाला भिडणारं संभाजीनगरमधील गेट-टुगेदर, Video
सर्व पहा

९ फेब्रुवारी रोजी पूजाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या पतीची, आई-वडिलांची आणि ९ वर्षांच्या मुलाची माफी मागितली आहे. "माझ्या मुलाची काळजी घ्या," अशी भावनिक विनंती तिने चिठ्ठीत केली होती. पूजाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी करण शिंदेवर गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
नवऱ्याच्या मित्रावर प्रेम अन् शेवटी पश्चाताप; पुण्यातील महिलेनं आयुष्य संपवलं, कागदाचे फाटलेले तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल