प्रवेशाचं आमिष अन् 50 लाखांचं बजेट
ही फसवणूक ६ एप्रिल २०२४ पासून २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली. आरोपी शरणगौड (रा. कर्नाटक) याने बिरनारायण यांचा विश्वास संपादन केला. "तुमच्या मुलीला कर्नाटक येथील एका नामांकित महाविद्यालयात पायलट कोर्ससाठी प्रवेश मिळवून देतो," असे आमिष त्याने दाखवले. या संपूर्ण कोर्ससाठी ५० लाख रुपये खर्च येईल, असे सांगून त्याने टप्प्याटप्प्याने बिरनारायण यांच्याकडून ५ लाख ४५ हजार रुपये उकळले.
advertisement
दोन वर्षं फक्त आश्वासनं आणि फसवणूक
मुलीच्या उज्वल भविष्यासाठी वडिलांनी पै-पै जमा करून ही रक्कम आरोपीला दिली. मात्र, पैसे घेऊनही प्रवेश मिळत नसल्याचे पाहून सिंग यांना संशय आला. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी फक्त तारखा देत होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बिरनारायण सिंग यांनी मंगळवारी (२४ फेब्रुवारी) पोलिसांत धाव घेतली.
दिघी पोलिसांनी या प्रकरणी शरणगौड विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एजंटच्या सांगण्यावर विश्वास ठेवून लाखो रुपये देण्यापूर्वी पालकांनी महाविद्यालयात जाऊन खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. स्वप्न पूर्ण करण्याच्या ओढीत एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कष्टाची कमाई गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
