'पती-पत्नीमधील वैचारिक मतभेद इतके खोल होते की त्यांनी विलंब न करता वेगळे होण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात हिंसाचार किंवा गुन्हेगारीचा कोणताही आरोप नव्हता. दोन्ही व्यक्तींशी शांतपणे कायदेशीर प्रक्रिया पाळून वेगळं होण्याचा निर्णय घेतला', असं ही केस हाताळणाऱ्या वकील राणी सोनवणे यांनी सांगितलं आहे. भारतामध्ये घटस्फोटाचे खटले बहुतेकदा दीर्घकाळ प्रलंबित राहतात, पण हे प्रकरण लगेच सोडवण्यात आले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून जोडपे वेगळे राहू लागले, असंही सोनवणे म्हणाल्या.
advertisement
'त्या दोघांचंही लव्ह मॅरेज होतं, दोन ते तीन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर पतीने आपण जहाजावर काम करतो, असं पत्नीला सांगितलं. तसंच त्याला कधी आणि कुठे पोस्ट केले जाईल? किती काळ दूर राहिल, हे पती स्पष्ट करू शकत नव्हता', असं वकिलाने सांगितलं.
'जोडप्याने अनिश्चित राहणीमानाचा विचार केला आणि परस्पर सहमती दर्शवून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकरणांमध्ये लागू असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून न्यायालयाने आपला निर्णय दिला', असे वकील सोनवणे म्हणाल्या.
