विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
अविनाश पांडुरंग साप्ते (वय 65, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यात त्याची आई कुसुम साप्ते (वय 80) आणि भाचा आशिष अशोक समेळ (वय 45) जखमी झाले आहेत. याप्रकरणी आशिष समेळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
advertisement
अंकुश सोसायटीत काय घडलं?
ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास मेहुणपुरा येथील अंकुश सोसायटीत घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अविनाश, त्याची आई कुसुम आणि तक्रारदार आशिष एकाच सोसायटीत राहतात. त्यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू होता.
आईसोबत भांडण केलं अन्...
घटनेच्या रात्री अविनाश दारू पिऊन घरी आला. त्याने आईसोबत भांडण सुरू केले. रागाच्या भरात त्याने आईच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर चाकूने वार केले. आजीला वाचवण्यासाठी आशिष समेळ धावले असता, अविनाशने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून अविनाशला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या कुसुम साप्ते यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.