आयुषची हत्या होईल, पोलिसांना अंदाज नव्हता
वादातून स्वतःच्या नातवाची किंवा बहिणीच्या मुलाची हत्या केली जाईल असा अंदाज पोलिसांना नव्हता, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहेत. आता गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी त्यांच्यावर कारवाई करणार. कोणत्याच गँगला आणि गँगस्टरच्या चुकीला माफी नाही, असा इशारा देखील अमितेश कुमार यांनी दिला आहे.
advertisement
कायद्याचे परिणाम भोगावे लागणार
ज्या आरोपींनी अशी घटना घडवून आणली, त्यांना कायद्याचे परिणाम भोगावे लागणार आहे. काही आरोपींना अटक झाली असून बाकीचे आरोपी देखील गजाआड होतील, असं पुणे पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. आयुषवर गोळीबार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह 13 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आयुक्तांचा घुमजाव
दरम्यान, चार दिवस अगोदर मिरवणूक वेळेत संपण्याचा आग्रह धरणाऱ्या पोलीस आयुक्तांनी मिरवणूक हाताबाहेर गेल्यावर मात्र घुमजाव केले आहे. मिरवणूक कोणत्या वेळी संपते हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, तर उत्साह, शांततेत मिरवणूक पार पडली ही बाब आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. गणेश विसर्जनाचा संपूर्ण सोहळा शांततेत पार पडला, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असं पोलिस आयुक्तांनी म्हटलं आहे.