मयत महिलेचे नाव नम्रता शैलेंद्र व्हटकर (१९) असे आहे. नम्रताचे दोन वर्षांपूर्वी शैलेंद्र प्रकाश व्हटकर (३०) याच्याशी लग्न झाले होते. मात्र, काही काळाने नम्रताचे तिच्यासोबत कंपनीत काम करणाऱ्या शाहरूख पठाण याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. याच कारणावरून पती-पत्नीत वारंवार वाद होत होते. दोन महिन्यांपूर्वी नम्रता पतीला सोडून शाहरूखसोबत राहण्यास गेली होती.
advertisement
Pune News: पुण्यातील हॉटेलच्या खोलीतून येत होती तीव्र दुर्गंधी; दरवाजा उघडताच उडाली मोठी खळबळ
दागिने मागितले अन् घात झाला: गुरुवारी (२२ जानेवारी) नम्रताने तिचे सोन्याचे दागिने परत मिळवण्यासाठी पती शैलेंद्रशी संपर्क साधला. शैलेंद्रने तिला दागिने देण्याच्या बहाण्याने वाडेबोल्हाई मंदिराजवळ बोलावून घेतले. नम्रता आणि शाहरूख तिथे पोहोचले असता, शैलेंद्रने वादाचे रूपांतर हाणामारीत केले. संतापलेल्या शैलेंद्रने खिशातून चाकू काढून नम्रतावर सपासप वार केले.
नम्रताचा आरडाओरडा ऐकून शाहरूख त्या ठिकाणी धावला, मात्र तोपर्यंत शैलेंद्र पसार झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत नम्रताला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी शाहरूख पठाण याने दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी पती शैलेंद्र व्हटकर याला बेड्या ठोकल्या आहेत.
