लग्नानंतर सासरच्यांकडून त्रास
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात हेमलता बाळासाहेब मगर यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादींची मुलगी दीप्ती हिचा विवाह रोहन कारभारी याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच तिला सासरच्यांकडून त्रासाला सामोरे जावे लागले. या प्रकरणात पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि दिराविरुद्ध विविध कलमान्वये गंभीर गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अशातच या प्रकरणात धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.
advertisement
राहत्या घरी गळफास
दीप्तीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून दीप्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दिप्ती प्रेग्नेंट असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, तिला मुल होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे दीप्तीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडलं, अशी माहिती समोर आली आहे.
चारचाकी वाहन घेण्यासाठी सतत पैशांची मागणी
दरम्यान, दीप्तीला माहेरून चारचाकी वाहन घेण्यासाठी सतत पैशांची मागणी केली जात होती. 25 डिसेंबर 2019 पासून 24 जानेवारी 2026 या दरम्यान हा छळाचा प्रकार सुरू होता. धक्कादायक म्हणजे, दीप्तीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा अत्यंत गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. त्यामुळे आता दिप्तीला न्याय कधी मिळणार? असा सवाल विचारला जात आहे.
