आयुषवर संध्याकाळपर्यंत अंत्यसंस्कार
आयुषचे वडील आणि कुटुंबातील काही सदस्य सध्या तुरुंगात आहेत. आयुषच्या हत्येनंतर, जयंत कोमकर, संजीवनी कोमकर आणि गणेश कोमकर यांनी पॅरोलची मागणी केली होती. पोलिसांनी आयुषचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. आज मृतदेह ताब्यात घेऊन संध्याकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. या अंत्यसंस्कारासाठी, आयुषचे वडील आणि वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर यांना पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
advertisement
बंडू आंदेकरवर खुनाचा गुन्हा
माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष गणेश कोमकर याच्यावर गोळीबार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह 13 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणी यश पाटील आणि अमित पाटोळे यांना अटक केली आहे. दोन दिवस गणेशविसर्जन असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आयुष कोमकर याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.