फसवणुकीची पद्धत : सायबर भामटे व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर 'तुमच्या गाडीचे ई-चलन भरा' असा संदेश पाठवतात. यासोबत एक APK फाईल जोडलेली असते. ही फाईल उघडताच मोबाईलमध्ये आपोआप तीन संशयास्पद अॅप्लिकेशन्स इन्स्टॉल होतात. यानंतर मोबाईलचा संपूर्ण ताबा हॅकर्सकडे जातो. हॅकर्स मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टचा वापर करून संबंधित व्यक्तीच्या डीपीसह "मी हॉस्पिटलमध्ये असून तातडीने पैशांची गरज आहे" असे मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करतात.
advertisement
यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "सरकारी यंत्रणा कधीही एपीके (APK) फाईलद्वारे दंड भरण्यास सांगत नाहीत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक किंवा फाईल चुकूनही उघडू नका," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुणेकरांनो! 'थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवण्याचा विचारही करू नका; RTO नं आधीच उचललं हे मोठं पाऊल
स्वतःचा बचाव कसा कराल?
अधिकृत स्रोतांचाच वापर करा: ई-चलन पाहण्यासाठी फक्त अधिकृत 'महाट्रॅफिक' अॅप किंवा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा.
APK फाईल टाळा: व्हॉट्सअॅपवर आलेली कोणतीही फाईल (विशेषतः .apk फॉरमॅटमधील) डाउनलोड करू नका.
घाई करू नका: "दंड भरा नाहीतर कारवाई होईल" अशा धमकावणाऱ्या मेसेजला तातडीने प्रतिसाद न देता खात्री करा.
ओळख पटवा: ओळखीच्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास प्रथम त्यांना फोन करून खात्री करा, कारण त्यांचे खाते हॅक झालेले असू शकते.
फसवणूक झाल्यास काय करावे?
१९३० या सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांकावर तातडीने संपर्क साधा. www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. तातडीने इंटरनेट बंद करा आणि बँकेचे व्यवहार/युपीआय पिन ब्लॉक करा.
