TRENDING:

Pune Crime : पुण्यात बनावट सोनं तारण ठेवून बँकेलाच फसवलं; लाखोंचं कर्ज घेतलं, सत्य समजताच पदाधिकाऱ्यांना फुटला घाम

Last Updated:

आरोपींनी बनावट सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवले. सुवर्ण मूल्यमापनकार लक्ष्मण पाटील याने हे सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन बँकेची दिशाभूल केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : विश्वासू सुवर्ण मूल्यमापनकार (व्हॅल्यूअर) आणि कर्जदारांनी मिळून बँकेला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार धायरी येथील प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेत उघडकीस आला आहे. बनावट सोने खरे असल्याचे भासवून बँकेकडून लाखो रुपयांचे कर्ज लाटत या त्रिकुटाने ७ लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवले (AI Image)
बनावट सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवले (AI Image)
advertisement

बँकेचाच 'व्हॅल्यूअर' ठरला सुत्रधार

धायरी येथील प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, ज्या सुवर्ण मूल्यमापनकारावर सोन्याची शुद्धता तपासण्याची जबाबदारी होती, त्यानेच कर्जदारांशी हातमिळवणी केली. २८ मार्च २०२५ ते २५ जून २०२५ या कालावधीत हा गैरप्रकार सुरू होता.

असा उघड झाला बनाव

आरोपींनी बनावट सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवले. सुवर्ण मूल्यमापनकार लक्ष्मण पाटील याने हे सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन बँकेची दिशाभूल केली. या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बँकेने कर्जदारांना ७ लाख ४४ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. मात्र, कर्जाची मुदत संपूनही परतफेड न झाल्याने आणि संशय आल्याने दागिन्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यावेळी तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे स्पष्ट झाले आणि बँकेच्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला.

advertisement

बँकेच्या वतीने मेघनाथ सदाशिव बोडस (६३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण उमाजी पाटील (सुवर्ण मूल्यमापनकार, रा. आंबेगाव पठार) गणेश बाबासाहेब आदलिंग (कर्जदार, रा. किरकटवाडी) आणि शशिकांत संभाजी गोदगे (कर्जदार, रा. आंबेगाव पठार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata ची टँकसारखी EV, Toyota च्या धाकड SUV ला देते टक्कर, रेंजमध्ये कोण बेस्ट?
सर्व पहा

नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. डी. सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बँकेच्या विश्वासार्हतेचा फायदा घेऊन अशा प्रकारे फसवणूक झाल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात बनावट सोनं तारण ठेवून बँकेलाच फसवलं; लाखोंचं कर्ज घेतलं, सत्य समजताच पदाधिकाऱ्यांना फुटला घाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल