नेमकं काय घडलं?
गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक लक्ष्मी रोड, बाजीराव रोड आणि तिळक रोड परिसरात दाखल होत असतात. अशातच मुंग्यांना सुद्धा जागा मिळणार नाही, एवढी तुफान गर्दी असते. अशातच अलका चौक परिसरात दोन गट पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असताना वादवादी झाली अन् पुढे हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांसमोर हा प्रकार घडला.
advertisement
पोलीस अधिकारी तातडीने पोहोचला अन्
शिवमुद्रा वाद्यपथक वादन करत असताना ही घटना घडली. तिळक रोड आणि लक्ष्मी रोड परिसरातील चौकात ही घटना घडली. अखेर एक पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचला अन् मध्यस्थीने वाद थांबला. मात्र, याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाहा Video
दरम्यान, हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती 3 वाजता अलका टॉकीज चौकात दाखल झाला.. भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जन मिरवणूक पारंपारिक रथातून काढण्यात आली.. अलका टॉकीज चौकातून भंडाऱ्याची उधळण आणि अतिशबाजी करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला निरोप देण्यात आला तर 3 वाजून 51 मिनिटांनी रंगारी गणपतीच विसर्जन पार पडलं.