TRENDING:

गर्भाशयाची गाठ काढायची होती पण डॉक्टरांनी केलं भलतंच कांड, काही दिवसात सत्य समजताच पुण्यातील महिला हादरली

Last Updated:

शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी महिलेला शारीरिक त्रास जाणवू लागला. त्या पुन्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेल्या तेव्हा धक्कादायक बाब समोर आली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे (हडपसर): पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी रुग्णालयातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गर्भाशयातील साधी गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करायला गेलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचे डॉक्टरांनी तिची कोणतीही संमती नसताना थेट गर्भाशयच काढून टाकले. याप्रकरणी मांजरी पोलिसांनी साई केअर हॉस्पिटलमधील चार डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टरांनी थेट गर्भाशयच काढलं (प्रतिकात्मक फोटो)
डॉक्टरांनी थेट गर्भाशयच काढलं (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

तक्रारदार महिलेच्या गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे २०२३ मध्ये सोनोग्राफी अहवालात समोर आले होते. उपचारासाठी त्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी मांजरीतील साई केअर हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्या. डॉक्टरांनी त्यांना लेझर शस्त्रक्रियेद्वारे केवळ गाठ काढावी लागेल, असे आश्वासन दिले होते. १५ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि १७ सप्टेंबरला त्यांना घरी सोडण्यात आले.

advertisement

तपासणीत धक्कादायक वास्तव उघड

शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी महिलेला शारीरिक त्रास जाणवू लागला. त्या पुन्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेल्या असता, डॉक्टरांनी गाठ काढण्याऐवजी संपूर्ण गर्भाशयच काढून टाकल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेपूर्वी महिलेने केवळ गाठ काढण्याची परवानगी दिली होती, गर्भाशय काढण्याबाबत कोणतीही संमती (Consent) दिलेली नव्हती. याबाबत डॉक्टरांना जाब विचारला असता, त्यांनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

advertisement

पाच जणांवर गुन्हे दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

याप्रकरणी पीडितेने मांजरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब) आणि ३ (५) अन्वये निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या/पुणे/
गर्भाशयाची गाठ काढायची होती पण डॉक्टरांनी केलं भलतंच कांड, काही दिवसात सत्य समजताच पुण्यातील महिला हादरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल