काय आहे ही 'हायटेक' चोरीची पद्धत?
पारंपारिक पद्धतीने लॉक तोडून कार पळवणे आता कठीण झाले आहे. त्यामुळे चोरटे दिल्ली किंवा चीनच्या बाजारपेठेत मिळणाऱ्या OBD (On-Board Diagnostics) डिव्हाइस आणि रिलेबॉक्सचा वापर करत आहेत. चोरटे लॅपटॉप आणि विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने कारचा इंजिन कोड स्कॅन करतात. ओबीडी डिव्हाइस कारला कनेक्ट करून गाडीची पूर्ण इलेक्ट्रॉनिक सिस्टम हॅक केली जाते. एकदा सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश मिळवला की, गाडीचे सेन्सर आणि ट्रॅकिंगसाठी असलेले जीपीएस सिस्टम तात्काळ बंद केली जाते, ज्यामुळे गाडीचा मागमूस काढणे अशक्य होते.
advertisement
तुमची एक 'छोटी चूक' पडू शकते महाग!
अनेकांना सवय असते की ते गाडी कुठेही अनधिकृत ठिकाणी पार्क करतात किंवा घाईत खिडक्या पूर्ण बंद झाल्या आहेत की नाही हे पाहत नाहीत. चोरटे याच संधीची वाट पाहत असतात. विशेषतः स्मार्ट की आणि सेन्सर लॉक असलेल्या गाड्या त्यांच्या निशाण्यावर आहेत.
स्वतःच्या कारची काळजी कशी घ्याल?
१. पार्किंगची जागा: गाडी नेहमी सुरक्षित आणि सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या अधिकृत पार्किंगमध्येच लावा.
२. मॅन्युअल लॉकचा वापर: केवळ रिमोट लॉकवर अवलंबून न राहता स्टिअरिंग लॉक किंवा गिअर लॉक यांसारख्या मॅन्युअल सुरक्षा साधनांचा वापर करा.
३. चेकलिस्ट: गाडी सोडण्यापूर्वी सर्व खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे लॉक असल्याची खात्री करा.
४. गिअर आणि हँडब्रेक: गाडी पार्क करताना नेहमी हँडब्रेक ओढा. उतार असल्यास पहिल्या गिअरमध्ये आणि चढाव असल्यास रिव्हर्स गिअरमध्ये गाडी ठेवा.
