नेमकी घटना काय?
महेंद्र सोपान कांबळे (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी महेंद्र हा दारूच्या नशेत धुंद होता. तो किरकोळ कारणावरून आपल्या पोटच्या मुलाला अमानुषपणे शिवीगाळ करत मारहाण करत होता. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पत्नी मध्यस्थी करायला गेली. मात्र त्याचा राग महेंद्रला अनावर झाला.
advertisement
"तुला खल्लासच करतो" म्हणत वार
रागाच्या भरात महेंद्रने टेबलावर असलेला भाजी कापण्याचा धारदार चाकू उचलला. "तुला आज खल्लासच करतो," असं ओरडत त्याने पत्नीच्या पोटात चाकू भोसकला. या अचानक झालेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून परिसरात रक्ताचा सडा पडला होता. जखमी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी महेंद्र कांबळे याला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे लक्ष्मी चौक परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
