नेमकी घटना काय?
मूळचे झारखंडचे असलेले अभिषेककुमार सीताराम पाठक (वय ३०, रा. हिंजवडी) यांना आपले घरगुती साहित्य गावी पाठवायचे होते. यासाठी त्यांनी 'EIE MARKET PLACE TECHNOLOGIES' या ट्रान्सपोर्ट कंपनीची मदत घेतली. कंपनीचे ऑपरेशन हेड मोहनकुमार आणि एम.डी. सोना त्रिवेदी यांनी सामान सुरक्षितरित्या झारखंडला पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते.
१५ आणि १६ नोव्हेंबर दरम्यान ही घटना घडली. आरोपींनी आधी सामान नेण्यासाठी फिर्यादीकडून १ लाख २८ हजार रुपये अॅडव्हान्स घेतले. मात्र, पैसे घेऊनही सामान गावी पोहोचवले नाहीच. उलट फिर्यादीचे एकूण २३ लाख ८० हजार रुपये किमतीचे मौल्यवान घरगुती साहित्य परस्पर लंपास करून त्याचा अपहार केला.
advertisement
2 आठवडे कॉलेजला दांडी; वडिलांनी विचारला जाब, रागात पुण्यातील तरुणानं केलं असं की पोलीसही चक्रावले
सामान मिळत नसल्याचे आणि कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच पाठक यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या तक्रारीवरून मोहनकुमार आणि सोना त्रिवेदी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६(३), ३१६(५) आणि ३(५) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.
