2 आठवडे कॉलेजला दांडी; वडिलांनी विचारला जाब, रागात पुण्यातील तरुणानं केलं असं की पोलीसही चक्रावले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
गेल्या दोन आठवड्यांपासून योगेश महाविद्यालयात जात नसल्याचे वडिलांच्या निदर्शनास आले होते. याबाबत वडिलांनी त्याला विचारणा केली.
पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात दांडी मारल्याबद्दल वडिलांनी जाब विचारल्याच्या रागातून १६ वर्षीय मुलाने घर सोडले आहे. आळंदी रस्त्यावरील राजीव गांधीनगरमध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
योगेश श्याम दुनघव (वय १६) असे घर सोडून गेलेल्या मुलाचे नाव आहे. तो खडकी येथील टिकाराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून योगेश महाविद्यालयात जात नसल्याचे वडिलांच्या निदर्शनास आले होते. याबाबत वडिलांनी त्याला विचारणा केली. तर, त्याने आपण क्रिकेट खेळण्यासाठी कॉलेजला दांडी मारल्याची कबुली दिली. या कारणावरून वडिलांनी त्याला समज देत जाब विचारला. वडिलांनी रागावल्याचा राग मनात धरून योगेशने कोणालाही काहीही न सांगता घर सोडले.
advertisement
योगेश बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधमोहीम राबवली, मात्र तो सापडला नाही. अखेर योगेशच्या कुटुंबीयांनी येरवडा पोलिसांत धाव घेतली. मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत अज्ञात व्यक्तीविरोधी गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे योगेशचा शोध सुरू केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 9:35 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
2 आठवडे कॉलेजला दांडी; वडिलांनी विचारला जाब, रागात पुण्यातील तरुणानं केलं असं की पोलीसही चक्रावले










