काळ्या रंगाची कार, चालकाचं बारीक लक्ष, मंगेश काळोखे वाचू नये म्हणून खतरनाक प्लॅनिंग, नक्की काय केलं? CCTV VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
रायगड जिल्ह्याच्या खोपोलीत शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली.
रायगड जिल्ह्याच्या खोपोलीत शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी काळोखे यांचा पाठलाग करून त्याच्यावर तलवार, चॉपर आणि कुऱ्हाडीने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की जागीच काळोखे यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा आता सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
सीसीटीव्ही व्हिडीओनुसार, हा सधारण हल्ला नव्हता, तर पूर्व नियोजित कट असल्याचं दिसून येत आहे. मंगेश काळोखे यांची हत्या करण्यापूर्वी एक काळ्या रंगाची संशयास्पद कार त्यांचा सातत्याने पाठलाग करत होती. चालकाचं काळोखे यांच्या बारीक लक्ष होतं. संबंधित चालकानेच टीप दिल्यानंतर मंगेश काळोखे यांना गाठून त्यांची हत्या केल्याची माहिती आता समोर येत आहे.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे मंगेश काळोखे वाचू नयेत, यासाठी हल्लेखोरांनी पूर्णपणे प्लॅनिंग केल्याचं देखील समोर आलं. याचा धक्कादायक खुलासा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून झाला आहे. फुटेजमध्ये काळोखे यांचा एका टोळीने भररस्त्यात फिल्मी स्टाइल पाठलाग केल्याचं स्पष्ट दिसत असून, मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असतानाच हा क्रूर हल्ला झाला. त्यांच्यावर २४ ते २७ वार झाले. त्यांचा जीव गेल्यानंतर देखील हल्लेखोर त्यांच्यावर अमानुषपणे वार करत होते. ते कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहिले नाही पाहिजे, याच हेतूने हा हल्ला केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे (शिंदे गट) यांचे पती मंगेश काळोखे हे २६ डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास मुलाला शाळेत सोडून दुचाकीने परतत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक काळ्या रंगाची संशयास्पद कार त्यांच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे दिसते. एका रिकाम्या रस्त्यावर संधी साधून हल्लेखोरांनी त्यांना घेरले आणि भररस्त्यात शस्त्राने वार करून त्यांची निघृण हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह रस्त्यातच फेकून घटनास्थळावरून पळ काढला. नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या वादातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक चर्चा आहे.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 9:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काळ्या रंगाची कार, चालकाचं बारीक लक्ष, मंगेश काळोखे वाचू नये म्हणून खतरनाक प्लॅनिंग, नक्की काय केलं? CCTV VIDEO









