नेमकी घटना काय?
मयत ज्येष्ठ महिलेचे नाव आशा पाटील (६५) असे आहे. आशा पाटील या रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाषाण रस्त्यावरील एनसीएल (NCL) इन्स्टिट्यूटसमोरून मॉर्निंग वॉक करत जात होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या एका अतिवेगवान कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
चालक घटनास्थळावरून पसार: अपघात झाल्यानंतर माणुसकीला काळीमा फासत कार चालक मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून वेगाने फरार झाला. जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं.
या घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. पुण्यातील 'हिट अँड रन'च्या वाढत्या घटनांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
