TRENDING:

Pune Accident : पुण्यातील मुळशीत भीषण अपघात! भरधाव टेम्पोने पाच गाड्यांना उडवलं, काळजाचा ठोका चुकवणारा CCTV Video समोर

Last Updated:

Pune Accident Video : टेम्पो पायावरून गेल्यानंतर जखमी झालेला तरुण वेदनेने तडफडत होता. तर या अपघातात इतर 4 ते 5 जण किरकोळ दुखापत होऊन जखमी झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Accident News : पुण्यात वाहतूक कोंडीने पुणेकरांना हैराण केलं असताना आता पुण्यातील बेशिस्त वाहन चालवणाऱ्या चालकांचं प्रमाण देखील वाढलं आहे. पुण्यातील अपघातात मोठी वाढ झाल्याचं चित्र पहायला मिळत असताना आता मुळशीमधून धक्कादायक घटना समोर आली. पुण्यातील मुळशीमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. काल दुपारच्या सुमारास एका नियंत्रण सुटलेल्या भरधाव आयशर टेम्पोने एक दोन नव्हे तर तब्बल 5 वाहनांना उडवल्याचं पहायला मिळालं. याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Pune Accident Video
Pune Accident Video
advertisement

तरुण वेदनेने तडफडत होता

नियंत्रण सुटलेल्या भरधाव आयशर टेम्पोने रिक्षा, कारसह दोन दुचाकींना टेम्पोने धडक दिल्याचं पहायला मिळालं. यामध्ये 1 दुचाकीस्वाराच्या पायावरून चाकं गेल्यानं त्यात तो गंभीर जखमी झालाचं पहायला मिळालं. टेम्पो पायावरून गेल्यानंतर जखमी झालेला तरुण वेदनेने तडफडत होता. तर या अपघातात इतर 4 ते 5 जण किरकोळ दुखापत होऊन जखमी झाले आहेत. तर धडक बसलेल्या वाहनांचही यात मोठं नुकसान झाल्याचं पहायला मिळतंय. सुदैवाने याच कुणाचाही मृत्यू झाला नाही.

advertisement

पाहा Video

पाच गाड्यांना उडवलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, आता याचं घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने दुचाकी स्वारांना उडवतानाचं दृश्य कैद झालयं. लाल रंगाचा टेम्पो भरधाव वेगात आला अन् दुचाकीवरून जात असलेल्या दोन गाड्यांना उडवलं. मुळशी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून टेम्पो चालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मार्गावरील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident : पुण्यातील मुळशीत भीषण अपघात! भरधाव टेम्पोने पाच गाड्यांना उडवलं, काळजाचा ठोका चुकवणारा CCTV Video समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल