अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते विद्यार्थी
हे सर्व विद्यार्थी एका विशेष 'स्टडी व्हिजिट'साठी (अभ्यास दौऱ्यासाठी) दुबईला गेले होते. नियोजित वेळापत्रकानुसार, हे विद्यार्थी शनिवारी आणि रविवारी दोन टप्प्यांत भारतात परतणार होते. मात्र, आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली, परिणामी या विद्यार्थ्यांना तेथेच थांबावे लागले आहे.
सर्व विद्यार्थी सुरक्षित
advertisement
महाविद्यालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व ८० विद्यार्थी आणि शिक्षक दुबईच्या मध्य भागात असून पूर्णपणे सुरक्षित आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांनी किंवा कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे. दुबईतील भारतीय दूतावासातील अधिकारी या विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात असून त्यांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न
विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय सक्रिय झाले आहे. हवाई वाहतूक पुन्हा सुरळीत होताच या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने किंवा उपलब्ध मार्गाने मायदेशी आणले जाईल. जर हवाई मार्ग उघडण्यास विलंब झाला, तर भारतीय दूतावासाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
