पुणे : शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच कोथरूड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. केवळ एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या मैत्रीच्या रागातून 23 वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संताप आणि खळबळ निर्माण झाली आहे. नागेशच्या आईने त्या दिवशी नेमकं काय घडलं याविषयी सांगितले आहे.
advertisement
पुण्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अपयशी ठरले का असा सवाल उपस्थित होत आहे . पुणे शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत…मुलीशी बोलतो म्हणून एका कुटुंबाने चक्क 23 वर्षीय तरुणाला जीव जाई पर्यंत मारले आहे.
10 मिनिटांत येऊन तुमचा मुलगा घेऊन जा....
14 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.15 वाजण्याच्या सुमारास नागेशला मोबाईलवर फोन आला. फोन आल्यानंतर तो घरातून मोटरसायकलवरून बाहेर पडला. काही वेळानंतर रात्री सुमारे 8 वाजता नागेशच्या मोबाईलवरूनच त्याच्या आईला फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने शिवीगाळ करत नागेशला कोथरूडमधील मेगासिटी परिसरात मारहाण केल्याचे सांगितले आणि 10 मिनिटांत येऊन तुमचा मुलगा घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ अशी धमकी दिली.
नागेशला इमारतीच्या टेरेसवर मारहाण
यानंतर नागेशची आई आणि काही नातेवाईक तातडीने कोथरूडमधील मेगासिटी परिसरात पोहोचले. तेव्हा परिसरात मोठी गर्दी जमली होती. नागेशला इमारतीच्या टेरेसवर मारहाण सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. नातेवाईक टेरेसवर पोहोचले असता नागेश गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला होता. त्याचे कपडे फाटलेले होते आणि आजूबाजूला लाकडी दांडके पडलेले होते. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना ससून रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नागेशची आई सुरेखा जाधव यांच्या फिर्यादीवरून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आतापर्यंत 9 जणांना अटक
मृत तरुणाचे नाव नागेश संजय जाधव त्याच वय अवघे 23 असे असून तो शिवाजीनगर परिसरातील वडारवाडी येथे राहत होता. नागेश हा शिवाजीनगर भागात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात आईला मदत करत होता.मात्र नागेश याच्या झालेल्या हत्येमूळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे…पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे.
हे ही वाचा :
