TRENDING:

Lonavala Crime : अखेर श्रेयाच्या मृत्यूचं गुढ उकललं! टायगर पॉईंटवर पटरीमागे सापडला सर्वात मोठा पुरावा, तपासात धक्कादायक वळण

Last Updated:

Lonavala Tiger Point Shreya Pati Death : सुरुवातीला हा घातपात किंवा अपघात असल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या धक्कादायक घटनेमागचं वास्तव आता हळूहळू समोर येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Lonavala Tiger Point Shreya Pati Death ( गणेश दुडुम, प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील टायगर पॉईंट परिसरात काल एकच खळबळ उडाली. लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या 400 फूट खोल दरीत एका मुंबईतील तरुणीचा मृतदेह आढळून आला. श्रेया नरेंद्र पटी असं या तरुणीचं नाव असून तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अशातच 19 वर्षीय श्रेया पटी या तरुणीचा मृत्यू हा अपघात नसून ती आत्महत्या असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मुंबईहून ट्रेकिंगचं निमित्त सांगून आलेल्या श्रेयाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचा शोध लोणावळा ग्रामीण पोलीस घेत होते.
Pune Lonavala Tiger Point Shreya Pati Death
Pune Lonavala Tiger Point Shreya Pati Death
advertisement

अपघात नसून आत्महत्या

सुरुवातीला हा घातपात किंवा अपघात असल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या धक्कादायक घटनेमागचं वास्तव आता हळूहळू समोर येत आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होती. तिच्या घरातील अंतर्गत कलह आणि कौटुंबिक वादामुळे तिची मनस्थिती ढासळली होती. याच मानसिक त्रासामुळे तिने थेट मुंबईवरून लोणावळा गाठलं आणि आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.

advertisement

दोन्ही डिव्हाईस लॉक असल्याने तपासात अडथळे

शिवदुर्ग रेस्क्यू टीम, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या सहाय्याने 390 फूट खोल दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस आता तांत्रिक पुराव्यांची वाट पाहत आहेत. श्रेयाचा मोबाईल आणि लॅपटॉप सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, मात्र ते दोन्ही डिव्हाईस लॉक असल्याने तपासात मोठे अडथळे येत आहेत. टपरीमागे एक बॅग सापडली. ती बॅग श्रेयाची होती. या उपकरणांमधील डेटा अनलॉक झाल्यानंतरच तिच्या आत्महत्येपूर्वीच्या मनस्थितीबद्दल आणि अंतिम संवादाबद्दल अधिक स्पष्टता मिळू शकणार आहे. कौटुंबिक वादाचे नेमके स्वरूप काय होते, हे शोधणं आता पोलिसांसमोरचं मुख्य आव्हान आहे.

advertisement

आत्महत्या असल्याचे प्राथमिक निष्कर्ष

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तिथल्या पुराव्यांवरून ही आत्महत्या असल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढले आहेत. श्रेया ही उच्चशिक्षित असूनही तिने कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सध्या पोलीस तिच्या कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी करण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Lonavala Crime : अखेर श्रेयाच्या मृत्यूचं गुढ उकललं! टायगर पॉईंटवर पटरीमागे सापडला सर्वात मोठा पुरावा, तपासात धक्कादायक वळण
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल