TRENDING:

पुण्यात 2 हजार रूपयांसाठी 4 तरुणांचं कांड; मध्यरात्रीच्या अंधारात गाठलं वृद्ध महिलेचं घर अन् संतापजनक कृत्य

Last Updated:

अवघ्या दोन हजार रुपयांसाठी चार तरुणांनी एका वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य केलं. या चौघांनी महिलेच्या घरावर विटा फेकून हल्ला केला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्याच्या मोशी परिसरातून गुंडगिरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात अवघ्या दोन हजार रुपयांसाठी चार तरुणांनी एका वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य केलं. या चौघांनी महिलेच्या घरावर विटा फेकून हल्ला केला. "आम्ही या भागाचे भाई आहोत, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही," असं म्हणत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली.
अंधारात गाठलं वृद्ध महिलेचं घर अन् संतापजनक कृत्य (प्रतिकात्मक फोटो)
अंधारात गाठलं वृद्ध महिलेचं घर अन् संतापजनक कृत्य (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

ही घटना शुक्रवारी (१३ मार्च) मध्यरात्री अडीचच्या सुमारास मोशी येथील संजय गांधी नगरमध्ये घडली. सनिगुरू दीपसिंग गोत्रा यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वागत गायकवाड, अमोल लोखंडे, अमय पवळे आणि अभय तांगडे (सर्व रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Mumbai News: मुंबईत प्रमुख रेल्वे स्थानकांवर 2 दिवस असणार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, नेमकं कारण काय?

advertisement

आरोपींनी फिर्यादीच्या आईकडे दोन हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, वृद्ध महिलेने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग मनात धरून या चौघांनी महिलेच्या घरावर विटांचा वर्षाव केला. यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि काच लागल्यामुळे फिर्यादीच्या आईच्या ओठाला गंभीर दुखापत झाली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
सर्व पहा

हल्ला केल्यानंतर आरोपींनी पीडित कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे मोशी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, भोसरी पोलिसांनी याप्रकरणी वेगाने तपास सुरू केला आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा वाढत चालेली गुंडगिरी पाहायला मिळाली.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात 2 हजार रूपयांसाठी 4 तरुणांचं कांड; मध्यरात्रीच्या अंधारात गाठलं वृद्ध महिलेचं घर अन् संतापजनक कृत्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल