TRENDING:

Pune BJP Candidate List : उपऱ्यांना फुलं, निष्ठावंतांना नारळ! घराणेशाहीतील कुणाला लागली लॉटरी? पुणे भाजप उमेदवारांची संपूर्ण यादी

Last Updated:

PMC Election BJP Candidate List : भाजपकडून रविवारी सायंकाळी उमेदवारी यादी जाहीर होणं अपेक्षित होतं. मात्र यादी जाहीर करण्यापेक्षा भाजपकडून थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune PMC Election BJP Candidate List : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सर्वपक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले गेले. पुण्यात देखील एबी फॉर्म देताना मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय नाट्याचा परमोच्च बिंदू पाहायला. अशातच भाजपने मुक्ता टिळक यांच्या मुलाला तर गिरीश बापट यांच्या लेकीला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपवर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. अशातच आता भाजपची यादी समोर आली आहे. भाजपने कुणाकुणाला एबी फॉर्म दिले, याची माहिती समोर आलीये.
PMC Election BJP Candidate List
PMC Election BJP Candidate List
advertisement

भाजपकडून रविवारी सायंकाळी उमेदवारी यादी जाहीर होणं अपेक्षित होतं. मात्र यादी जाहीर करण्यापेक्षा भाजपकडून थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असल्याचे सांगितलं गेलं. त्यामुळे अनेक निष्ठावंतांच्या हाती काहीच लागलं नाही, अशी परिस्थिती पुण्यात देखील पहायला मिळाली. अशातच भाजपची  पुण्यातील उमेदवारांची यादी पाहा...

भाजपची पुण्यातील उमेदवारांची यादी 

प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव उमेदवार १ उमेदवार २ उमेदवार ३ उमेदवार ४
कळस-धानोरी राहुल भंडारे संगीता दांगट वंदना खांदवे अनिल टिंगरे
फुलेनगर-नागपूर चाळ रेणुका उगले सुधीर वाघमोडे पूजा जाधव राहुल जाधव
विमाननगर-लोहगाव श्रेयस खांदवे अनिल सातव ऐश्वर्या पठारे रामदास दाभाडे
खराडी-वाघोली शैलजित बनसोडे रत्नमाला सातव तृप्ती भरणे सुरेंद्र पठारे
कल्याणीनगर-वडगाव शेरी नारायण गलांडे श्वेता गलांडे कविता गलांडे योगेश मुळीक
येरवडा-गांधीनगर संतोष आरडे ईशा विटकर संगीता धुमाळ संजय भोसले
गोखलेनगर-वाकडेवाडी नीशा मानवतकर सायली माळवे रेश्मा भोसले हरीश निकम
औंध-बोपोडी परशुराम वाडेकर भक्ती गायकवाड सपना छाजेड सनी निम्हण
सूस-बाणेर-पाषाण रोहिणी चिमटे गणेश कळमकर मयूरी कोकाटे लहू बालवडकर
१० बावधन-भुसारी कॉलनी किरण दगडे रूपाली पवार अर्पणा वरपे दिलीप वेडेपाटील
११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर अजय मारणे शर्मिल शिंदे मनीषा बुटाला अभिजित राऊत
१२ शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी अमृता म्हेत्रे अपूर्वा खाडे पूजा जगडे डॉ. निवेदिता एकबोटे
१३ पुणे स्टेशन-जय जवाननगर नीलेश आल्हाट शोभा मेमाणे अश्विनी भोसले सोनू निकाळजे
१४ कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा हिमाली कांबळे किशोर धायरकर मंगला मंत्री उमेश गायकवाड
१५ मांजरी बुद्रुक-केशवनगर नंदा आबनावे डॉ. महादेव कोंढरे सारिका घुले शिवराज घुले
१६ हडपसर-सातववाडी शिल्पा होळे उज्ज्वला जंगले आबा तुपे संदीप दळवी
१७ रामटेकडी-माळवाडी खंडू लोंढे शुभांगी होळे पायल तुपे प्रशांत तुपे
१८ वानवडी-साळुंखे विहार धनराज घोगरे कालिंदी पुंडे कोमल शेंडकर अभिजित शिवरकर
१९ कोंढवा खुर्द-कौसर बाग नूर फातिमा हुसेन खान सुप्रिया शिंदे सतपाल पारघे अमर गव्हाणे
२० शंकर महाराज मठ-बिबवेवाडी राजेंद्र शिळीमकर मानसी देशपांडे महेंद्र सुंदेचा तन्वी दिवेकर
२१ मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क प्रसन्न वैरागे सिद्धी शिळीमकर मनीषा चोरबोले श्रीनाथ भिमाले
२२ काशेवाडी-डायस प्लॉट मृणाल कांबळे संदीप लडकत अर्चना पाटील विवेक यादव
२३ रविवार पेठ-नाना पेठ पल्लवी जावळे अनुराधा मंचरे ऋतुजा गडाळे विशाल धनवडे
२४ कसबा गणपती-के.नेहरू रुग्णालय कल्पना बहिरट उज्ज्वला यादव देवेंद्र वडके गणेश बिडकर
२५ शनिवार पेठ-म.फुले मंडई स्वप्नाली पंडित राघवेंद्र उर्फ बापू मानकर स्वरदा बापट कुणाल टिळक
२६ घोरपडे पेठ-गुरुवार पेठ विष्णू हरिहर प्रज्ञा माळवदे ऐश्वर्या थोरात अजय खेडेकर
२७ नवी पेठ-पर्वती अमर आवळे स्मिती वस्ते लता गौड धीरज घाटे
२८ जनता वसाहत-हिंगणे खुर्द वृषाली रिठे मनीषा बोडके विनया बहुलीकर प्रसन्न जगताप
२९ डेक्कन जिमखाना-हॅपी कॉलनी सुनील पांडे मंजुश्री खर्डेकर मिताली सावळेकर पुनीत जोशी
३० कर्वेनगर-हिंगणे-होम कॉलनी सुशील मंगडे रेश्मा बराटे तेजश्री पवळे राजाभाऊ बराटे
३१ मयूर कॉलनी-कोथरूड दिनेश माथवड ज्योत्स्ना कुलकर्णी वासंती जाधव पृथ्वीराज सुतार
३२ वारजे-पॉप्युलरनगर हर्षदा भोसले सायली वांजळे भारतभूषण बराटे सचिन दोडके
३३ शिवणे-खडकवासला धनश्री कोल्हे ममता दांगट सुभाष नाणेकर किशोर पोकळे
३४ नऱ्हे-वडगाव बुद्रुक हरिदास चरवड कोमल नवले जयश्री भूमकर राजाभाऊ लायगुडे
३५ सनसिटी-माणिकबाग ज्योती गोसावी मंजूषा नागपुरे सचिन मोरे श्रीकांत जगताप
३६ सहकारनगर-पद्मावती वीणा घोष शैलजा भोसले सई थोपटे महेश वाबळे
३७ धनकवडी-कात्रज डेअरी बाळा धनकवडे वर्षा तापकीर तेजश्री बदक अरुण राजवाडे
३८ बालाजीनगर-आंबेगाव अश्विनी चिंदे संदीप बेलदरे राणी भोसले प्रतिभा चोरघे
३९ अप्पर सुपर-इंदिरानगर वर्षा साठे दिंबर धवरी रूपाली धाडवे बाळा ओसवाल
४० कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी अर्चना जगताप वृषाली कामठे पूजा कदम रंजना टिळेकर
४१ महंमदवाडी-उंड्री प्राची आल्हाट जीवन जाधव स्नेहल दगडे अतुल तरवडे

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाजरीची भाकरी नेहमीच खाता; थंडीत नक्की ट्राय करा हा पौष्टिक पदार्थ, सोपी रेसिपी
सर्व पहा

दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन प्रचार सभा घेणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचारादरम्यान, एक दिवस पुणे दौऱ्यावर येतील पण प्रचारसभा न घेता प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करतील.

मराठी बातम्या/पुणे/
Pune BJP Candidate List : उपऱ्यांना फुलं, निष्ठावंतांना नारळ! घराणेशाहीतील कुणाला लागली लॉटरी? पुणे भाजप उमेदवारांची संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल