नदीवरील पाणी वाढले तरी रस्ता मोकळा
सध्याच्या स्थितीला शिवणे-नांदेडदरम्यान असलेला पूल हा कमी उंचीचा असल्याने खडकवासला धरणातून पाणी सोडल्यावर तो बऱ्याचदा पाण्याखाली जातो. त्यामुळे हा पूल सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूकीसाठी बंद करण्यात येतो. त्याचा पूर्ण परिणाम हा नागरिकांना, विद्यार्थी, कामगार तसेच दवाखाने, आयटी पार्ककडे जाणाऱ्यांना सहन करावा लागतो. ज्यात एक तास अधिक वेळ खर्चिक होतो. या वारंवार होणार्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नांदेड सिटी ते शिवणे दरम्यान मुठा नदीवर नवीन उंच पूल उभारण्यात येणार आहे.
advertisement
नव्या पुलाच्या प्रस्तावानुसार सुमारे 250 मीटर लांबाची आणि 24 मीटर रुंदीचा असा पूल उभारण्यात येईल. पुलासाठी साधारण 48 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा पूल सध्याच्या पूर्वेकडे उभारण्यात येणार आहे.
कसा असेल हा नवा पूल?
नांदेड सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच्या सर्कलपासून नदीकाठी सुमारे 150 मीटर लांबीचा जोडरस्ता तयार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मूठा नदीवर साधारण 250 मीटर लांबीचा पूल उभारण्यात येईल. त्यापैंकी सुमारे 200 मीटर भाग हा मुठा नदीपात्रावर असणार आहे. ही नदी ओलाडंल्यानंतर शिवणे हद्दीत सध्या असलेल्या 18 मीटर रुंद असलेल्या जागेचा विकास करुन तो रस्ता 24 मीटर रुंद करण्यात येणार आहे.
