खरं तर पुणे महापालिकेत सर्वात आधी दोन्ही राष्ट्रवादीची युती होईल अशी चर्चा सुरू होती. पण दोन्ही राष्ट्रवादीच्या या चर्चेदरम्यान अजित पवार यांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणुक लढवावी अशी अट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर ठेवली होती. ही अट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मान्य न झाल्याने पक्षाने महाविकास आघाडीसोबत म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या शांताई हॉटेलमधील बैठकीला हजर राहून चर्चेला सूरूवात केली होती.त्यामुळे युती फिस्कटल्याची चर्चा होती.
advertisement
दरम्यान आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता.त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी अचानक महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाहेर पडली होती. आणि अखेर आज संध्याकाळी दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. या युतीची अधिकृत घोषणा उद्या 29 डिसेंबर 2025 ला दुपारी होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे शरद पवार गटाची मागणी अजित पवारांनी मान्य केल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाला 32-35 जागा मिळण्याचा अंदाज आहे.आणि तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हावर होणार आघाडी होणार आहे. आणि उद्या दुपार पर्यंत दोन्ही राष्ट्रवादीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुणे महापालिका निवडणुकीत 165 जागा आहेत.या 165 पैकी 32-35 शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा सोडण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतल्याची माहिती आहे.असे जर झाल्यास 130-133 जागांवर पुण्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी लढण्याची शक्यता आहे.
