TRENDING:

बुधवार पेठ नरकातली भयानक घटना, 'ती' मदतीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आली अन्...,महिला पोलिसाच्या कृत्याने सगळे हादरले

Last Updated:

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचं निष्पन्न झालं

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजित पोते, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे:  पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मदतीसाठी स्वतः पोलीस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यावर झाला आहे. या प्रकरणी संबंधित महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसंच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली.

advertisement

हा सगळा प्रकार घडत असताना त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलीस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेले. तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती, त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आलं. त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे.

advertisement

या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले.

advertisement

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ४ अल्पवयीन मुलींची सुटका

हा सगळा प्रकार पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी बुधवार पेठ भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करत मोठी कारवाई केली. कारवाईदरम्यान ४ अल्पवयीन मुलींची बुधवार पेठेतून पोलिसांनी सुटका केली आणि या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

महिला आयोगाकडून कारवाईचे आदेश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कधी थालीपीठ पिझ्झा खाल्ला का? खवय्यांची असते गर्दी, ट्राय तर करा
सर्व पहा

या सगळ्या प्रकरणी आता राज्य महिला आयोगाने लक्ष घातलं असून ज्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने हा सगळा धक्कादायक प्रकार केला आहे, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करा अशी आदेश स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याची सविस्तर चौकशी करून अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्यास देखील चाकणकर यांनी सांगितलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
बुधवार पेठ नरकातली भयानक घटना, 'ती' मदतीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आली अन्...,महिला पोलिसाच्या कृत्याने सगळे हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल