TRENDING:

पैशाच्या वादातून मित्राने केला साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Last Updated:

शुभम व त्याच्या साथीदारांनी लोखंडी हत्याराने गळ्यावर, छातीवर, पोटावर, पायावर वार केले. डोक्यात दगड घालून त्यांचा चेहरा विद्रुप करुन टाकला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : पैशांच्या वादातून मित्राने साथीदारांच्या मदतीने मित्राच्या डोक्यात दगड घालून चेहरा विद्रुप करुन खुन केला. खून झालेल्याचे नावही निष्पन्न झाले नव्हते, असे असताना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने खुन झालेल्याचे नाव निष्पन्न करुन चार आरोपींच्या 12 तासांच्या आत मुसक्या आवळल्या. सुभाष ऐलगच्चे (वय 40, रा. स्वराज आर्केड, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

advertisement

पोलिसांनी शुभम राजेश शिंदे (वय 25, रा. ताकवले कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, नांदेड सिटी), लकी सुरेंद्र सिंग (वय 23, रा. खडकी अ‍ॅम्युनेशन फॅक्टरी), सुनिल संतोष खलसे ऊर्फ एस के (वय 19, रा. संभानगर झोपडपट्टी, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. वारजे येथील आकाशनगर जवळील वन विभागाच्या टेकडीवरील सिमेंटच्या विसाव्या शेजारील निर्जन जागेत एकाचा मृतदेह वारजे पोलिसांना 23 जानेवारी रोजी मिळाला होता. कोणीतरी त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारुन तसेच दगडाने चेहरा विद्रुप करून त्यांचा खून केला होता. त्याची ओळख पटली नव्हती. वारजे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

advertisement

18 लाख रुपये दिले

पोलिसांना माहिती मिळाली की, गणपती माथा ते शिंदे पुल वारजे दरम्यान दोन संशयित थांबले असून त्यांची काहीतरी गुन्हा केल्याचे त्यांच्या हालचाली व बोलण्यावरुन वाटत आहे. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले आणि दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील माहितीवरुन अन्य दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर राजेंद्र ऐलगच्चे यांनी एकाला 18 लाख रुपये दिले होते.

advertisement

डोक्यात दगड घातला

18 लाखांची ती वसुली करुन देतो, असे सांगून शुभम शिंदे याने 11 लाख रुपये घेतले होते. हे पैसे राजेंद्र ऐलगच्चे मागत होता. राजेंद्र ऐलगच्चे याला संपविले तर आपल्याला पैसे द्यावे लागणार नाही, असे समजून त्याने साथीदारांना मदतीला घेतले. राजेंद्र ऐलगच्चे यांना वारजे येथील शनि मंदिर टेकडी येथे 21 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता बोलवले. त्याप्रमाणे राजेंद्र ऐलगच्चे तेथे आले. तेव्हा शुभम व त्याच्या साथीदारांनी लोखंडी हत्याराने गळ्यावर, छातीवर, पोटावर, पायावर वार केले. डोक्यात दगड घालून त्यांचा चेहरा विद्रुप करुन टाकला.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

67 वर्षांची आजी आणि झोळीत 4 चपात्या; रेल्वे स्टेशनवर पोलिसांकडून चेकिंग आणि समोर आलं धक्कादायक रहस्य

मराठी बातम्या/पुणे/
पैशाच्या वादातून मित्राने केला साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल