मंदिराचे दरवाजे उचकटून प्रवेश: पाषाण गावातील निम्हण आळी परिसरात श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि श्री गणेश मंदिर ही दोन पुरातन आणि जागृत देवस्थाने आहेत. गुरुवारी (२२ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधून मंदिराचे मुख्य दरवाजे उचकटले आणि आत प्रवेश केला.
advertisement
चोरट्यांनी मंदिरामधील दानपेटीचे कुलूप अत्यंत शिताफीने तोडले आणि त्यातील ४० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. शुक्रवारी सकाळी जेव्हा भाविक आणि पुजारी मंदिरात आले, तेव्हा त्यांना दरवाजा तुटलेला आणि दानपेटी रिकामी दिसली. या चोरीची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात मोठी गर्दी झाली होती.
याप्रकरणी विष्णू बबनराव निम्हण यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. पोलीस हवालदार दांगड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मंदिरांमध्ये सुरक्षा रक्षक किंवा अधिक सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आवाहन पोलिसांनी स्थानिक रहिवाशांना केले आहे.
