सुरक्षा यंत्रणांची धावपळ
साप नेमका मंचासमोर दिसून आल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरू झाली. मात्र, त्यानंतर साप मंचाखाली गेला आहे. मंत्री महोदय मंचावर येण्यापूर्वीच या सापाला सुरक्षितपणे बाजूला करण्याचे मोठे चॅलेंज सध्या सुरक्षा यंत्रणांसमोर होतं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. काही वेळाने सापाला पकडून बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
पाहा Video
दीक्षांत समारंभात पालकांचा गोंधळ
सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या दीक्षांत समारंभात पालकांनी गोंधळ घातल्याचं पहायला मिळालं. दीक्षांत समारंभाच्या ठिकाणी पालकांना जाऊ न दिल्याने पालक वर्ग आपली नाराजी व्यक्त करत आहेत. युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून पालकांना योग्य त्या सूचना योग्य वेळी न दिल्याने पालक वर्गात मोठी नाराजी आहे. ऑडिटोरियमच्या बाहेर पालक गोंधळ घालत आहेत. देशाचे रक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दीक्षांत सोहळा कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
डीआरडीओ इथं महत्त्वाची बैठक
दरम्यान, डीआरडीओ इथं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर ते नाशिकला रवाना होती. नाशिकमध्ये स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस एमके-वन ए’ या लढाऊ विमानाच्या उत्पादनाच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल, तसंच ओझर मिनी स्मार्ट टाऊनशिपचं उद्घाटनही राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.