काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
हिंजवडीमध्ये डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक नियमबाह्य वेळेत रस्त्यावर धावतात, निवासी भागात आरएमसी प्लांट आहेत, पीएमआरडीएने मोकळ्या केलेल्या रस्त्यांवर अजूनही स्क्रॅप, राडारोडा आहे तसेच रस्त्यावरील खड्डे अजूनही बुजवण्यात आलं नाही. हिंजवडीमध्ये कोट्यावधी रुपयाचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय होतो, इथून कंपन्या परराज्यात जात आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
advertisement
सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा
मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की, हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अशी विनंती देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. अन्यथा गणपतीनंतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार
दरम्यान, अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अॅक्टिव झाले आहेत. विशेष: अजित पवार हिंजवडीमधील कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेताना दिसतायेत. अजित पवार यांनी विकास कामांची गती वाढण्याचा सुचना देखील दिल्या आहेत. अशातच आता येत्या काही दिवसात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार अशी जुगलबंधी पहायला मिळू शकते.
