रेशन वितरणात नववर्षापासून बदल
शहरात सुमारे 4 लाख 93 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. ज्यांच्यासाठी 253 दुकानांमधून धान्य वितरण सुरू आहे. नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना गहूसोबत ज्वारीही दिली जात होती. मात्र, जानेवारीपासून धान्य वाटपाच्या पद्धतीत बदल केला जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनांमधील नवीन धान्यप्रमाण पुन्हा लागू करण्यात येणार आहे.
advertisement
Krushi Market Rate: शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; कांदा, मका आणि सोयाबीनच्या दरात विक्रमी घसरण
जानेवारी 2026 पासून अंत्योदय योजनेत लाभार्थ्यांना दरमहा एकूण 35 किलो धान्य मिळणार आहे, ज्यामध्ये 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ समाविष्ट आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेत प्रत्येक कुटुंबाला दरमहा 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ पुरवले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधील 2 लाख रेशनकार्ड रद्द
चुकीची माहिती देणे आणि कागदपत्रांमधील त्रुटी यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल सव्वा दोन लाख नागरिकांचे रेशन बंद करण्यात आलं. अन्न व नागरी पुरवठा विभागाने राबवलेल्या शिधापत्रिका पडताळणी मोहिमेत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.या पडताळणी मोहिमेत आजमितीस २२ हजार ६९६ शिधापत्रिकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पिंपरी विभागातील ७२,२५६, चिंचवडमधील ८२,५६९ आणि भोसरीमधील ६७,७७२ नागरिकांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.
