भाजप फक्त 15 जागा देण्यास तयार
भाजप - शिवसेना युतीच्या चर्चा या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तासापर्यंत सुद्धा संपलेल्या नव्हत्या. शिवसेना पस्तीस ते चाळीस जागेची मागणी भाजपकडे करत होती मात्र भाजप फक्त 15 जागा देण्यास तयार होते. यावरून बऱ्याच दिवस चर्चेचे गुहाळ रंगल्यानंतर अखेर शिवसेनेकडून 135 ते 140 उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आले आहेत. मात्र भाजप सेनेचं का बिनसलं याची अंदर की बात ही वेगळीच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
advertisement
भाजप-सेनेतील वाद विकोपाला
28 डिसेंबर रोजी शिवसेनेकडून 15 उमेदवारांची यादी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. पर्यायाने हीच यादी भाजपला पाठवण्यात आली होती. या यादीवर भाजप सेनेच्या युतीचे भवितव्य अवलंबून होते. कारण भाजप सेनेला 15 जागा देण्यास तयार होते आणि 35 जागा मागणारी शिवसेना सुद्धा 28 तारखेपर्यंत 15 जागेवर तयार झाली होती. त्यानुसार शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे, रविंद्र धंगेकर, अजय भोसले, उल्हास तुपे, आबा बागुल यांनी एक 15 उमेदवारांची तयार केली पण याच यादी मुळे भाजप सेनेत वाद विकोपाला गेला.
यादीतील 15 उमेदवार कोण?
या यादीमध्ये प्रभाग क्रमांक 41 ब मधून प्रमोद नाना भानगिरे, 41 क स्वाती अनंत टकले, 24 ड प्रणव रवींद्र धंगेकर, 23 क प्रतिभा रवींद्र धंगेकर, 26 ड उल्हास उर्फ वसंतराव बागुल, 37 क गिरीराज तानाजी सावंत, 37 ड रूपाली रमेश कोंडे, 38 क वनिता जालिंदर जांभळे, 38 इ स्वराज नमेश बाबर, 39 क मनिषा गणेश मोहिते, 6 ड आनंद रामनिवास गोयल, 3 क गायत्री हर्षवर्धन पवार, 16 ड उल्हास दत्तात्रय तुपे, 40 ड दशरथ पंढरीनाथ, काळभोर किंवा गंगाधर विठ्ठल बधे, 11 क वैशाली राजेंद्र मराठे यांचे नावं होती.
