TRENDING:

दुपारची वेळ, स्पा सेंटरमध्ये 4 पुरुषांसोबत होत्या 4 तरुणी, पोलिसांनी धाड टाकताच घडला थरार, एकीचा भयंकर अंत, पुण्यात काय घडलं?

Last Updated:

पुणे शहराच्या विमाननगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला असता पळून जाताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे शहराच्या विमाननगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली असता कारवाईपासून वाचण्यासाठी एका महिलेनं थेट इमारतीच्या गॅलरीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न फसला. इमारतीवरून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
Ai Generated Photo
Ai Generated Photo
advertisement

नेमकी घटना काय आहे?

पुणे शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली आहे. सोमवारी दुपारी विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवर असलेल्या एका उच्चभ्रू इमारतीत पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी इमारतीवरून उडी मारणाऱ्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तर स्पाचा मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'सिटी स्पेस' बिल्डिंगमध्ये 'द रुट्स स्पा' (The Roots Spa) नावाचं स्पा सेंटर सुरू होतं. इथं स्पाच्याल नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एक बनावट ग्राहक तिथे पाठवला. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या पथकाने पंचासमक्ष तिथे धाड टाकली.

advertisement

पळून जाण्याच्या प्रयत्नात मृत्यू

पोलिसांनी छापा टाकताच स्पा सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या कारवाईला घाबरून एक महिला आणि स्पाच्या मॅनेजरने दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उतरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, खाली उतरताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. यामध्ये ३० ते ३५ वयोगटातील एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही महिला मूळची पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबला 13000 रुपये भाव, आल्याचे दरही सुधारले, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

याच घटनेत स्पा मॅनेजर हुसेन शेख हा देखील खाली पडल्याने त्याचा पाय मोडला आहे. त्याच्यावर सध्या ससून जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. खरं तर, पोलिसांनी या कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळली होती. त्यांनी काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. आत गेल्यानंतर पोलिसांना तिथे ४ महिला आणि ४ पुरुष नको त्या अवस्थेत आढळून आले. त्या सर्वांना ताब्यात घेत असताना एका महिलेनं आणि स्पाच्या मॅनेजरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
दुपारची वेळ, स्पा सेंटरमध्ये 4 पुरुषांसोबत होत्या 4 तरुणी, पोलिसांनी धाड टाकताच घडला थरार, एकीचा भयंकर अंत, पुण्यात काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल