या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा देखील समावेश आहे. आयुषची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली होती. यात प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे यांचा समावेश होता. आता या प्रकरणात आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
advertisement
हत्येच्या तीन दिवसानंतर म्हणजेच ८ सप्टेंबरला रात्री उशिरा आयुष कोमकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला तुरुंगात असेल्या गणेश कोमकरने देखील हजेरी लावली होती. प्रंचड पोलीस सुरक्षेत आयुषवर अंत्यसंस्कार झाले. यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मध्यरात्री उशिरा सहा जणांना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये नक्की कोण आहेत? याबाबतचा तपशील समोर आला नाही. मात्र पहाटे पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केल्याचं सांगितलं जात आहे. यात बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी कोणावर गुन्हे दाखल आहेत?
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६०) याच्यासह कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४१), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय २३), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९) अशा १३ जणांचा समावेश आहे.