पुणे स्टनेशवरचा भार कमी करणार
पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी हडपसर आणि खडकी या दोन टर्मिनलचे काम सुरू आहे. यंदा डिसेंबरअखेर या दोन्ही टर्मिनलची कामे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनचा विकास करून रिमॉडेलिंग करण्यात येणार आहे. यामध्य स्थानकावरील फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे. त्याचा फायदा लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणार आहे. तसेच या प्रकल्पासोबत रेल्वे मार्ग वाढवण्याचे देखील नियोजन आहे.
advertisement
पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार, लवकरच होणार नवा रेल्वे मार्ग, इथं 250 एकरांवर मेगा टर्मिनल!
प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार
पुणे ते मुंबई तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आता रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे व्यस्त मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार तळेगाव ते उरळी आणि पुणे ते सोलापूर विभागातील वाडी जंक्शनपर्यंत तिसरी आणि चौथी मार्गिका केली जाईल. तळेगाव ते उरळी हा बाह्यवळण मार्ग करण्याचे नियोजन होते. परंतु, आता तो मार्ग दुहेरी करण्यात येणार असून तीच तिसरी आणि चौथी मार्गिका असेल. त्याचा आराखडा देखील कोकण रेल्वेने तयार केला आहे.
तळेगाव ते उरुळी मार्गावर 9 स्टेशन
तळेगाव ते उरुळी हा प्रस्तावित दुहेरी मार्ग येत्या 4 वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. यावर 9 रेल्वे स्टेशन असतील आणि 160 किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावेल. न्यू तळेगाव, वराळे, संत तुकाराम महाराज, कुरुळी (चाकण), संत ज्ञानेश्वर महाराज, वाघोली, कोलवडी, कुंजीरवाडी कॅबिन, उरळी (बायपासमार्गे) हे स्टेशन प्रस्तावित आहेत. यामधील न्यू तळेगाव रेल्वे स्टेशन मुख्य स्थानक असणार आहे.